शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF)
शालेय गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखडा (SQAAF) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील परि.८ मध्ये शालेय शिक्षणासाठी मानक ठरविणे व अधिस्वीकृती याबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील परि. ८.५ (D) खालील प्रमाणे आहे. प्रस्तावना :- 'राज्यातील शैक्षणिक मानके आणि अभ्यासक्रमांसह शैक्षणिक बाबींचे संचालन SCERT (NCERT च्या सल्ल्याने आणि सहकार्याने) करेल. SCERT ला एक संस्था म्हणून पुनरुज्जीवित केले जाईल. SCERT सर्व हितसंबंधींशी विस्तृत सल्लामसलत करुन शालेय गुणवत्ता मूल्यांकन आण ि अधिस्वीकृती फ्रेमवर्क (SQAAF) विकसित करेल. CRC, BRC आणि DIET यांच्या पुनरुज्जीवनासाठी "परिवर्तन व्यवस्थापन प्रक्रिया" देखील SCERT राबवेल. ज्याद्वारे या संस्थांची क्षमता आण ि कार्यसंस्कृती ३ वर्षात बदलून त्या उत्कृष्ट कार्यक्षम संस्था म्हणून विकसित होतील. दरम्यान, शाळा सोडण्याच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सक्षमता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यातील मूल्यांकन परीक्षा मंडळांद्वारे हाताळली जाईल.' ...