विद्यार्थी संचयी नोंदपत्रक

   विद्यार्थी संचयी नोंदपत्रक


     शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे विस्तृत स्वरुपात नोंदपत्रक म्हणून विद्यार्थी संचयी  नोंदपत्रकाकडे बघितले जाते. शासन नियम दिनांक 11 ऑक्टोबर 2011 मधील अनुक्रमांक 23 ख नुसार व RTE Act - 2009 मधील कलम 30 च्या प्रयोजनार्थ संचयी नोंदपत्रक विहित करण्यात आले आहे.

    विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्याबरोबर लागलीच संचयी नोंद पत्रकात वर्ग शिक्षकांकडून त्याची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती भरण्यास सुरुवात केली जाते.

    विषयात संपादित केलेली श्रेणी, उपस्थिती, आरोग्य विषयक माहिती, विशेष प्रगती, आवड - छंद, सुधारणा आवश्यक, व्यक्तिमत्व गुणविशेष या नोंदी प्रत्येक सत्राअखेरीस मूळ अभिलेख्यावरून भरण्यात येतात.

    सर्वांना मिळणाऱ्या लाभाच्या योजनांची शिवाय विशेष गरजा असणाऱ्या वंचित-दुर्बल घटकातील 

मुलांसाठी पुरविलेल्या विशेष शासकीय योजनांचे लाभ नोंदवावेत.

या पत्रकातील नोंदी करतानाच्या आवश्यक सूचना:-

१) या पत्रकातील नोंदी मूळ अभिलेखे पाहून कराव्यात.

२) हे नोंद पत्रक शिक्षकाने अद्ययावत करावे.

३) या अभिलेख्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.

४) प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याअगोदर विदयार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत स्थलांतर झाल्यास नोंदपत्रकाची मूळ प्रत दुसऱ्या शाळेकडे हस्तांतरित करावी व त्याची सत्यप्रत शाळेत जतन करावी.

    ५) प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी हे नोंदपत्रक आधार असेल.






PDF स्वरुपात सादर फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.





श्री.सचिन कचरू नाकोडे,
उपशिक्षक 
जि.प.शाळा आंबवली ता.मंडणगड जि.रत्नागिरी.
७५८८०१२८७१









Comments

Popular posts from this blog

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही A4