शालेय गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखडा (SQAAF)


शालेय गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखडा (SQAAF)

संदर्भ:- शालेय गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखडा (SQAAF)



    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील परि.८ मध्ये  शालेय शिक्षणासाठी मानक ठरविणे व अधिस्वीकृती याबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील परि. ८.५ (D) खालील प्रमाणे आहे.

प्रस्तावना :-

    'राज्यातील शैक्षणिक मानके आणि अभ्यासक्रमांसह शैक्षणिक बाबींचे संचालन SCERT (NCERT च्या सल्ल्याने आणि सहकार्याने) करेल. SCERT ला एक संस्था म्हणून पुनरुज्जीवित केले जाईल. SCERT सर्व हितसंबंधींशी विस्तृत सल्लामसलत करुन शालेय गुणवत्ता मूल्यांकन आण ि अधिस्वीकृती फ्रेमवर्क (SQAAF) विकसित करेल. CRC, BRC आणि DIET यांच्या पुनरुज्जीवनासाठी "परिवर्तन व्यवस्थापन प्रक्रिया" देखील SCERT राबवेल. ज्याद्वारे या संस्थांची क्षमता आण ि कार्यसंस्कृती ३ वर्षात बदलून त्या उत्कृष्ट कार्यक्षम संस्था म्हणून विकसित होतील. दरम्यान, शाळा सोडण्याच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सक्षमता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यातील मूल्यांकन परीक्षा मंडळांद्वारे हाताळली जाईल.'

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 'सार्थक' ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे एकूण २९७ टास्क्स निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील टास्क क्र. २१५ खालीलप्रमाणे आहे. 

    School Quality Assurance & Accreditation Framework (SQAAF) will be developed by SCERT as per guidelines developed by NIEPA & NCERT.

संदर्भ:- शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ दिनांक १५ मार्च २०२४


माहिती व संदर्भ साहित्य 

https://www.maa.ac.in/index.php?tcf=sqaaf


शाळा नोंदणी व माहिती भरणे.

https://scert-data.web.app/


    SQAAF ची माहिती ऑनलाईन भरल्यानंतर शाळा स्तरावर फाईल ठेवण्यासाठी FRONT PAGE नमुना येथे माहिती साठी देत आहोत. सहा क्षेत्रांच्या फाईल साठी उपयुक्त ठरेल.

    तसेच सर्व मानक निहाय शाळा स्तरावर जतन करावयाचे पुरावे यासाठी संपूर्ण मानक निहाय पेजेस PDF अथवा DOC स्वरुपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपले काम अद्ययावत होण्यास नक्कीच मदत होईल.



A4 साईज मधील PDF अथवा DOC स्वरुपात सदर फाईल प्राप्त करण्यासाठी Whatsapp क्रमांकावर संपर्क करावा. वेळेनुसार पूर्तता करण्यात येईल.

विनंती करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.


संपर्कासाठी क्लिक करा.


श्री.सचिन कचरू नाकोडे ,
उपशिक्षक,
जि.प.शाळा आंबवली,
ता.मंडणगड जि.रत्नागिरी.
७५८८०१२८७१

Comments

Popular posts from this blog

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही A4

विद्यार्थी संचयी नोंदपत्रक